महेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी कोळपेवाडी गावासह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत या यात्रेची सर्वजण वाट बघत असतात.
महेश्वर यात्रा कमिटीने खालील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तीन दिवसीय यात्रेचे नियोजन आणि स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 2 एप्रिल
सकाळी 6 वा. "साई सुरमैफिल" स्वरवंदन पाडवा पहाट कार्यक्रम
सकाळी 9 वा- भव्य रक्तदान शिबिर
सकाळी 10 वा- कावड मिरवणूक
सकाळी 3 ते 7 - देवाचा महाभिषेक
सायंकाळी 4 वा- बारा गाड्या
सायंकाळी- भव्य रथयात्रा
रात्री 9 वा माननीय रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा
रविवार दिनांक 3 एप्रिल
सकाळी 9 वा-स्थानिक कलाकार व तमाशा कलाकार हजेरी
दुपारी 2 वा बैलगाडा शर्यत
सोमवार दिनांक 4 एप्रिल
सायंकाळी 4 वा -नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्या
रात्री-9 वा -लावण्या दरबार कार्यक्रम
कोळपेवाडी यात्रेत सर्वानी आपापली काळजी घ्यावी. लहान मुले व वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी, आपल्या मौल्यवान वस्तू संभाळाव्या. वाहणे योग्य तिथे पार्किंग करावे.
यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.