सांगवीभुसारमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सांगवीभुसारमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी -:जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगवीभुसार मधील आरोग्य केंद्रात गावातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महिलांची प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात आली. डॉ. देवकर यांनी या महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन केले

ग्रामीण भागात आजही आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषत: महिलांकडून मासिक पाळीच्या काळात आवश्यक ती काळजी न घेतल्याने अनेक आजार उद्भवतात. याच बाबींचा विचार करून सांगवीभुसार ग्रामपंचायतीने दर महिन्याला गावातील महिलांना सॅनिटरी पॅड अत्यंत कमी दरात (1 रु ) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

याप्रसंगी सांगवीभुसारचे मार्गदर्शन विजय नाना जाधव उपसरपंच भाऊसाहेब जाधव आरोग्य केंद्राचे डॉ देवकर मॅडम ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यध्यपिका कडवे मॅडम ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी योगेश देशमुख साहेब,ग्राम संघाचे, सुवर्णा शिंदे व गावातील महिला उपस्थित होत्या.