माता रमाइंचे जीवन त्याग आणि समर्पणाचे प्रतीक – मा.आ.अशोकराव काळे

माता रमाइंचे जीवन त्याग आणि समर्पणाचे प्रतीक – मा.आ.अशोकराव काळे

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहरात त्यागमूर्ती रमाईमाता आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येवून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात (दि.७) फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाईमाता आंबेडकर यांची जयंती शेकडो भीम सैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलतांना मा.आ.अशोकराव काळे म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आदर्श हे समाजातील अत्याचार आणि अंधश्रद्धा दूर करण्यात मदतगार ठरले. त्यागमूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाईमातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ वैयक्तिक जीवनातच नाही तर सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात देखील प्रेरणा दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये माता रमाइंचे मोलाचे योगदान होते.ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जसे भारतीय समाजासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते त्याप्रमाणेच माता रमाइंचा त्यागही समाजातील प्रत्येक स्त्रीला सामर्थ्य देणारा असून त्यागमूर्ती म्हणून रमाईमातांचे आदर्श जीवन त्याग आणि समर्पणाचे प्रतीक होते असे प्रतिपादन मा.आ.अशोकराव काळे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कोपरगाव शहरातील पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते