High Alert - कोपरगाव तालुक्यातील 'ही' गावे हाय अलर्टवर

गोदावरी नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा 







गोदावरी नदीवर असलेल्या प्रकल्पाच्या वरच्या बाजूला असलेला नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावरून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असुन त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहण्याची शक्यता असल्याने नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 



Mahegaon Deshmukh 

Villages along the river banks have been put on alert as the discharge from the Nandur Madhmeshwar dam located on the upper side of the project on the Godavari river will be increased in a phased manner as the river is likely to overflow.  


नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात माीगल काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने छोटे पूल आहेत त्यावरून पाणी वाहत असेल तिथे पूल ओलांडू नये.





 गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीकिणाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहावे .गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने नांदूर मधमेश्वर त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आल्याने राहणाऱ्या लोकांनी सावधानता गोदावरी नदीकाठी



 राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी व स्थलांतरीत करा असे आवाहन कोपरगाव तालुक्याचे  तहसीलदार विजय बोरूडे यांनी केले आहे.


ही गावे हाय अलर्ट वर - 


वडगाव 

बक्तरपुर 

चासनळी 


मंजुर 


मायगाव देवी 


वेळापूर 

सुरेगाव

सांगवी भुसार 


कोळगाव थडी 


माहेगाव देशमुख 

मळेगाव थडी

कुंभारी

 

धारणगाव


हिंगणी



 चांदगव्हाण


 डाऊच

जेऊर कुंभारी कोपरगाव

संवत्सर 


कोकमठाण 


सडे 


कानेगाव 


वारी





गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27868 क्यूसेस


 पाण्याचा व‍िसर्ग सोडण्यात आला आहे. 
 

वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता ज‍िल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राध‍िकरणातर्फे नागर‍िकांना अत‍िदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सखल भागात राहणाऱ्या नागर‍िकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन ज‍िल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राध‍िकरणाचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी तथा न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी संदीप न‍िच‍ित यांनी प्रस‍िध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 166.3 मि.मी. (37.1 %) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27,868 क्युसेस 


पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
नागर‍िकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागर‍िकांनी तातडीने सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. 




नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. 


त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. 


सोमवारी सायंकाळी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा होणारा विसर्ग पुढील प्रमाणे – दारणा – १५हजार ८८ क्युसेक, कडवा – ७ हजार क्युसेक, पालखेड -२२ हजार क्युसेक, गंगापुर – १० हजार ३५ क्युसेक 



अचानक  नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिव‍ितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, 



धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.