📚 राज्यातील पीएच.डी. धारक शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
या शिक्षकांचे 'क्लास वन' अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
👨🏻💼 शालेय शिक्षण विभागातील क्लास वन, क्लास टू अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशी अनेक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. या रिक्त जागांवर पीएच.डी. झालेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती.
💁🏻♂️ राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत. मात्र त्यांना थोडीफार पगारवाढ मिळण्यापलिकडे फारसा फायदा होत नाहीये. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणंही टाळतात. त्यामुळे अशा शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा राज्याच्या शिक्षणक्षेत्रालाच होईल, अशी भावना शिक्षक व्यक्त करतायत. एकीकडे विद्यादान करताना स्वतःचाही शैक्षणिक विकास करणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांना अधिकारी केल्यास ते अधिक योग्य ठरेल.
📩 शिक्षक संघटनांच्या मागणीची दखल घेऊन, ग्रामविकास खात्याने सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलंय. त्यात वरिष्ठ अधिकारी पदासाठी पात्रता असणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे शिक्षक वरिष्ठ अधिकारी होऊ शकतात.
✍🏻 शिक्षण क्षेत्राला फायदा
शिक्षक संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलंय. मुलांना शिकवतानाच शिक्षकांचाही शैक्षणिक विकास होत असतो. असे शिक्षक हे अधिकारी झाल्यास शिक्षण क्षेत्राला त्याचा फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिली आहे.