लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश; विशाल गोरे यांच्याकडून दोन्ही आमदारांचे आभार !
वेळापूर | प्रतिनिधी
वेळापूर गावातील 80 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. कोपरगाव मतदारसंघातील दोन्ही आमदारांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कामासाठी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केल्याबद्दल कोपरगाव मतदारसंघातील दोन्ही सन्माननीय आमदारांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन, अशी भावना विशाल हरिभाऊ गोरे यांनी व्यक्त केली.
तसेच आगामी काळातही कोपरगाव मतदारसंघाला दोन्ही आमदारांचे भक्कम नेतृत्व व सहकार्य लाभत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने वेळापूर येथे भव्य, दिव्य आणि निसर्गरम्य स्मशानभूमीची उभारणी लवकरच पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्मशानभूमीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने गावातील महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून, स्मशानभूमीच्या पुढील विकासाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.