राज्य मराठी पत्रकार संघाची कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर
कोपरगाव प्रतिनिधी- राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, संघटक संजयराव भोकरे, सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे व कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली सदर नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्तीला उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी मान्यता दिली असुन कोपरगाव तालुका व शहर कार्यकारणी सर्वानूमते जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारणी मध्ये कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र जाधव, कार्याध्यक्षपदी किरण ठाकरे, सचिव विजय कापसे, सहसचिव सोमनाथ डफळ, संघटक काकासाहेब खर्डे, प्रसिद्धी प्रमुख पदी किसनराव पवार, तसेच कोपरगाव शहर अध्यक्षपदी हफिज शेख, उपशहरध्यक्षपदी स्वप्निल कोपरे तर शहर कार्याध्यक्षपदी बिपिनराव गायकवाड आदींची एक मताने निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मनीष जाधव, फकीरराव टेके, दिनेश जोशी, मधुकर वक्ते, विनोद जवरे, अमोल गायकवाड, राहुल कोळगे, गणेश बत्तासे, संदीप विदुर, विशाल लोंढे, राजेंद्र तासकर, सुमित थोरात, गोविंद वाकचौरे, अक्षय काळे, स्वप्ना जाधव, आदी सदस्य उपस्थित होते या सर्व नवनिर्वाचित कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.