इ केवायसी न केल्यास धान्य बंद होणार – हेमा बढे
कोपरगाव प्रतिनिधी :- धान्य घेण्यास पात्र असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची इ- के वाय सी तात्काळ करून घ्या अन्यथा धान्य बंद होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सौ हेमा बडे यांनी दिली आहे.
परंतु अजूनही अनेक लाभार्थ्यांची केवायसी करणे बाकी आहे. इ केवायसी करण्यासाठी शासनाकडून ॲप देण्यात आले असून त्याद्वारेही आपल्या मोबाईल मधूनच घर बसल्या किंवा आपण करू शकतो अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोपरगाव येथील रेशन दुकानदार यांच्या आढावा बैठकीत दिली आहे. तालुक्यातील सर्व लाभार्थी रेशन कार्डधारकांनी रेशन दुकानावर जाऊन आपली केवायसी करून घ्यावी . ज्यांची केवायसी होणार नाही त्यांचे नाव रेशन कार्ड तून कमी होणार असून त्यांचे धान्यही बंद होणार आहे.तरी आपण सर्वांनी दि.३१/३/२५ पर्यंत कोणतेही कारण न सांगता ई केवायसी करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.