धक्कादायक ! हंडेवाडी फाटा येथील इसमाची सात मो -या दरम्यान गळा चिरून हत्या ! सोबत होते 12 लाख रुपये !

 

मौजे देवगाव-कानळद रस्त्यालगत देवगाव  शिवारात दुपारी १२.३० च्या दरम्यान देवगाव येथील शेतकरी राजेंद्र रंगनाथ बोचरे यांना दुपारी १२.३० च्या सुमारास (एम.एच.१५ इ.सी.४४३६)या क्रमांकाची हिरोहोंडा कंपनीची मोटारसायकल उभी आढळली. 


त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना शेतात एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे तो कोपरगाव तालुक्यातील मंजूर ता.कोपरगाव येथील इसम अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक (वय अंदाजे ५४) यांचा असल्याचें चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. 


त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लासलगावचे स.पो.नी राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

अधिक माहिती घेतली असता तो मृतदेह अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक (वय अंदाजे ५४) रा.मंजूर हंडेवाडी फाटा ता.कोपरगाव येथील इसम यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांचे पाय सुद्धा बांधलेल्या अवस्थेत होते.




आज सकाळी ते निफाडहुन कानळदकडे येत असताना त्यांच्याकडे १२ लाख रुपयांची रक्कम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यांनी याबाबत पोलीस पाटील सुनील बोचरे यांना कळविले.त्यांनी याबाबत लासलगाव पोलीस ठाण्याला खबर दिली असता नाशिकच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे,एल.सी.बी.अधीक्षक हेमंत पाटील उपअधीक्षक सोमनाथ तांबे,लासलगावचे स.पो.नी राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.


अधिक चौकशीअंती तो मृतदेह अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक (वय अंदाजे ५४) रा.मंजूर हंडेवाडी फाटा ता.कोपरगाव येथील इसम यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांचे पाय बांधलेल्या अवस्थेत होते.आज सकाळी ते निफाडहुन कानळदकडे येत असताना त्यांच्याकडे १२ लाख रुपयांची रक्कम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.



मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी व परिसराची श्वान पथकाने तपासणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 




याबाबत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे व स.पो.नी.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पो.उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे,पो.उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,पो.नाईक संदीप शिंदे, पो.नाईक औदुंबर मुरडनर करीत आहेत.