मुसळधार पावसामुळे वेळापूर येथील खडखडी बंधारा फुटला - ब्राह्मण नाला मधून वाहतुक बंद

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे वेळा पूर येथील खडखडी बंधारा फुटला



संपूर्ण राज्यात पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. कोपरगाव तालुक्यात (Kopargaon) मुसळधार पाऊस सुरू आहे.

 अशातच तालुक्यातील वेळापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

येथील खडखडी बंधारा रात्री 2 च्या दरम्यान फुटला.


 सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. 


मात्र असं असलं तरी भविष्यात शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचे आणि बंधाऱ्या वर  मासेमारी साठी अवलंबून असलेल्या आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  



खडखडी बंधाऱ्याची उंची वाढवावी आणि त्याची डागडुजी करावी अन्यथा या वर्षीच्या पावसात बंधारा टिकणार नाही अशी भीती वाघ वस्ती येथील एका वयस्कर व्यक्तीने व्यक्त केली होती 

परंतु कोणीही त्यासाठी पुढाकार न घेतल्यामुळे 

सततच्या मुसळधार पावसामुळे सांडव्यातून पाण्याचा निचरा पुरेशा प्रमाणात न झाल्याने बंधारा फुटल्याची प्राथमिक माहिती आहे.









तसेच या वाहून जाणार्‍या पाण्यामुळे ब्राह्मण नाला येथील शिर्डी लासलगाव रस्ता देखील बंद झाला आहे.




कोपरगाव तालुक्यातील देर्डे भरवस रस्त्यावर असणारा व आता नविन पुलाचे काम सुरू असणारा ब्राह्मण नाला येथील पर्यायी सर्व्हिस रोड पावसाने खचला आहे.काल रात्री २ वाजेपासून या सर्व्हिस रोडवर पाणी असुन कमी अधिक प्रमाणात २ ते ३ फुट पाण्याचा भर आहे यामुळे लासलगाव कडुन शिर्डी कडे तसेच लासलगाव च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे गरजेचे आहे.त्यातच नगर मनमाड रोड कोकमठाण येथे सदगुरु गंगागिरीजी महाराज यांचा सप्ताह सुरू असल्याने कोपरगाव ते शिर्डी वाहतुक जाम होत असल्याने वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणुन या मार्गाचा वापर करत होते मात्र सदर मार्गही काल रात्रीपासून बंद झाला आहे.
 



पर्यायी मार्ग वापरावा - सुरेगाव - शहा - कारवाडी - हांडेवाडी