Bank locker Fraud कोपरगाव मधील 'या' बॅंकेच्या लॉकर मधून पावणे दोन लाख गायब


कोपरगाव शहरातील स्पंदना स्फूर्ती फायनशिअल्स लिमिटेड शाखेच्या कोपरगाव येथील बँक व्यवस्थापक रावसाहेब भिल्ल,कॅशियर अजय शेलार,लोन ऑफिसर अनिल शिरोदे, आदींनी आपल्या लोकर्स मधील 01 लाख 75 हजार 590 रुपयांची रक्कम अपहार करून आपल्या फायद्यासाठी वापरल्याचा गुन्हा फिर्यादी विजय बळीराम ताकमोघे (वय -31) रा.भराडखेडा ता.जाफराबाद जिल्हा जालना यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल केली असल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.



आपण बँकेत ठेवलेले रक्कम सांभाळण्याची जबाबदारी व्यवस्थापक रावसाहेब भिल्ल,कॅशियर अजय शेलार,लोन ऑफिसर अनिल शिरोदे यांची असताना त्यांनी मिळून आपली लोकर्स मधील 01 लाख 75 हजार 590 रुपयांची रक्कम अपहार करून आपल्या फायद्यासाठी वापरली आहे.

महत्त्वाची कागदपत्रे किंवा दागिण्यांसारख्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बॅंक लॉकर ही सर्वात सुरक्षित अशी जागा मानली जाते.तुमच्या परिचयातील अनेकांना तुम्ही बॅंक लॉकरचा वापर करताना बघितलंही असेल.लॉकर ही बॅंकेतील अशी जागा असते,जिथे तुम्ही तुमचे दागिणे,एखादी वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवू शकता.मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बॅंक लॉकर हा सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो.


या लॉकरची एक चावी ग्राहकांना दिली जाते.तर अन्य एक चावी ही बॅंकेकडे असते.तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या लॉकरमधील वस्तू काढू शकता किंवा पुन्हा ठेवू शकतात.लॉकरच्या दोन चाव्या असतात.त्यापैकी एक ग्राहकाकडे,तर दुसरी चावी बँकेकडे असते.लॉकर उघडण्यासाठी आधी बँक अधिकारी त्यांची चावी वापरतो.त्यानंतर तुम्हाला चावी लावून लॉकर उघडायचा असतो.विशेष म्हणजे लॉकर बंद करताना केवळ ग्राहकांच्या चावीने ते बंद करता येते.


 ज्या व्यक्तीच्या नावाने लॉकरची नोंदणी केली असते,त्यालाच हे लॉकर वापरण्याची परवानगी दिली जाते.इतर कोणालाही ते वापरता येत नाही. त्यामुळे लोकर्सची सुविधा सर्वात सुरक्षित मानली जात असते.मात्र यात बँकेचे रक्षकच भक्षक बनले तर काय होते याची अनुभूती नुकतीच कोपरगाव येथील एका ग्राहकास आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 



या प्रकरणी फिर्यादी इसम यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी फिर्यादी इसम विजय ताकमोघे यांनी म्हंटले आहे की,”आपण कोपरगाव शहरातील स्पंदना स्फूर्ती फायनशिअल्स लिमिटेड शाखेच्या कोपरगाव येथील बँक शाखेत दिनांक 12 मे रोजी रात्री 8.30 वाजता ते दिनांक 20 मे 2024 दरम्यान आपली रक्कम 01 लाख 75 हजार रुपये ठेवली होती.




सदर रक्कम सांभाळण्याची जबाबदारी व्यवस्थापक रावसाहेब भिल्ल,कॅशियर अजय शेलार,लोन ऑफिसर अनिल शिरोदे यांची असताना त्यांनी मिळून आपली लोकर्स मधील 01 लाख 75 हजार 590 रुपयांची रक्कम अपहार करून आपल्या फायद्यासाठी वापरली आहे.या प्रकरणी घटना उघड झाल्यावर तातडीने फिर्यादी विजय बळीराम ताकमोघे रा.भराडखेडा ता.जाफराबाद,जालना यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.404/2024 भारतीय दंड संहिता सन-2023 चे कलम 408,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलिस हे.को.के.ए.जाधव यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.के.ए.जाधव हे करीत आहेत.