येवला तालुक्यातील सत्यगाव येथील रहिवासी सौरभ अण्णा सांगळे (वय-१७ वर्ष)
यांचा गारदा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पडून संशयास्पद मृत्यू झाल्याने कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्काना उधाण आले असून सैनिकी स्कुल येथे मुलांना पोहण्यासह सर्व शिक्षण दिले जात असताना तो बुडाला कसा असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.शिवाय त्या ठिकाणी सैनिकी शाळा ही निवासी आहे.तेथे चल चित्रणासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे आहेत
या शिवाय वसतिगृहामध्ये सर्व विद्यार्थी नियंत्रकांच्या ताब्यात असताना रात्रीच्या सुमारास हा विद्यार्थी बाहेर गेलाच कसा ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,
नाशिक जिल्ह्यातील सत्यगाव येथील रहिवासी असलेला विद्यार्थी सौरभ अण्णा सांगळे हा काल शाळेजवळच असलेल्या गारदा नदीतील बंधाऱ्यात मृत अवस्थेत आढळून आला आहे.ही घटना काल उघडकिस आली असून या ठिकाणी कोपरगाव येथील एका ठेकेदाराचे काम सुरू असून त्या ठिकाणी त्यांचा पर्यवेक्षक गुलाब हसन शेख रा.गजानन नगर कोपरगाव
याला साठवण तलावात दि.२४ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यावर त्याने शाळा व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.
शाळा व्यवस्थापनाचे प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी दौलतराव जाधव यांच्या लक्षात आणून दिली आहे.
घटणास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेऊन त्याठिकाणी पंचनामा करून सदर विद्यार्थ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला असता सदर विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी खबर देणार पर्यवेक्षक गुलाब शेख यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्र.५०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.