नरेंद्र मोदी हे देशाचे सेवक असुन ते निस्वार्थपणे अहोरात्र काम करतात त्यांच्याविषयीचे अनुदगार भारतीय जनता पक्ष कधीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजवर विविध पदावर जबाबदारीने काम केले असुन त्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही.
कोपरगाव तहसील कार्यालयाचे चंद्रशेखर कुलथे यांनी या निवेदनाचा स्विकार केला. प्रारंभी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले प्रास्तविक करताना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वडयाचे तेल वांग्यावर काढुन हकनाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुदगार काढले ते निषेधार्ह असुन त्यांनी जनतेची तात्काळ माफी मागावी अन्यथा काळ्या फिती लावून त्याचा निषेध करू.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, बाळासाहेब पानगव्हाणे, सरचिटणीस दिपक चौधरी, अर्जुन माकोणे, कैलास घट, प्रकाश शेळके. शेतकरी आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानोडे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीकभाई कुरेशी, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
रोहोम पुढे म्हणाले की, देशाच्या सांस्कृतीक विचारधारेला काँग्रेस पक्ष आणि त्याचे राज्याचे नेतृत्व रसातळाला नेउन ठेवण्याचे पाप करत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवंग लोकप्रियतेसाठी आचरट वक्तव्ये करण्याची सवय आहे. शेवटी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.