वेळापूर प्राथमिक शाळेत शिवम विशाल गोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा


शिवम विशाल गोरे यांचा वाढदिवस वेळापूर प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रमाने साजरा




वेळापूर:
आपल्या मुलाचा वाढदिवस केवळ कौटुंबिक सोहळा न ठेवता तो समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून साजरा करण्याचा आदर्श 

श्री. विशाल हरीभाऊ गोरे

यांनी घालून दिला आहे. त्यांचे सुपुत्र शिवम विशाल गोरे

यांच्या वाढदिवसानिमित्त वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय बॅग,वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय साहित्याचा संच हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.


सामाजिक बांधिलकीचा वारसा
आजोबा माजी चेअरमन श्री. हरीभाऊ गोरे
आजोबा माजी उपसरपंच श्री. बाबासाहेब गोरे
यांचा वारसा


आजच्या काळात वाढदिवसावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी, तो पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी खर्च केल्याबद्दल ग्रामस्थांकडून गोरे परिवाराचे विशेष कौतुक होत आहे. 'शिक्षणासारख्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलून मुलाचा वाढदिवस साजरा करणे, हा एक स्तुत्य उपक्रम आहे,' अशी भावना यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.



या  कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद, गोरे परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिवम याला उदंड आयुष्याच्या आणि उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.