कोपरगाव मध्ये मोठ्या पोल्ट्री कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक ? बाबासाहेब कोळपे यांनी वेधले लक्ष ( पत्रकार सचिन कोळपे )


सध्या कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी शेती बरोबरच पोल्ट्री, शेळीपालन,दुध उत्पादन असे अनेक शेतीपुरक व्यवसाय करत आहेत. कराराद्वारे ब्राॅयलर पक्षी संगोपन करुन कंपन्यांना निर्धारित वेळेत देण्याचा व्यवसाय देखील अनेक शेतकरी करतात त्यांना "पोल्ट्री व्यावसायिक"देखील म्हटले जाते. कंपनीने एक दिवसाची पिल्ले,खाद्य, औषधे पुरविणे साधारणपणे २४०० ग्रॅम आकाराची साईज साधारणपणे ४२/४३ दिवसात बनविणे असा साधारणपणे करार आहे.या सर्वांमध्ये शेतकऱ्याला बांधुन घेतले जाते कंपन्या मात्र मोकाट असतात.हा विश्वसनीय व्यवसायात सर्व कंपन्या शेतकऱ्यांप्रती सहानुभूती ठेवुन असतात मात्र कंपनी निर्धारित वेळेपेक्षा ३० दिवस जादा काळ पक्षी ठेवुन या काळात झालेली मर शेतकऱ्यांच्या माथी मारुन शेतकऱ्यांना शुन्य बिल देण्याचा प्रताप या कंपनीने केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील शेतकरी बाबासाहेब आण्णासाहेब कोळपे यांनी या बाबतीत लक्ष वेधले आहे.या बाबतीत कंपनीचे शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क  केला असता त्यांनी कराराच्या आधारे शेतकर्यांना दमदाटी केली.कंपनी तुम्हाला पक्षी देवुन तुमच्यावर उपकार करते अशा स्वरुपाची प्रतिक्रिया दिली.लाईटबिल,लेबर व इतर खर्च करुन देखील शुन्य बिल आल्याने मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे भविष्यात प्रिमियम कंपनीसोबत करार करतांना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


*स्त्रोत: सदर बातमी सूरेगाव चे माजी सरपंच व पत्रकार सचिन कोळपे यांनी पाठविली आहे.