कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात छत्रपतींना अभिवादन
कोपरगाव प्रतिनिधी- अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंती निमित्त कोपरगाव तालुका पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांच्या वतीने अभिवादन करत छत्रपतींचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रूपाली धुमाळ, विस्तारधिकारी बाळासाहेब साबळे, प्रशांत तोरवणे, प्रशांत वाघमारे, श्रीमती पुजारी आदी कोपरगाव तालुका पंचायत समिती मधील विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अथांग कार्याची महिती सांगत सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपतींना अभिवादन केले