भारतीय बौद्ध महासभेच्या अहिल्यानगर जिल्हा संघटक पदी बौध्दाचार्य बिपिन गायकवाड
कोपरगाव प्रतिनिधी -: महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाच्या जिल्हा संघटक पदी तर कोपरगाव तालुका पालकमंत्री पदी बौध्दाचार्य बिपीन गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा या संस्थेचे संस्थापक बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार ॲड.बाळासाहेब आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ.हरीश रावलिया रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड.सुभाष जोंजाळे यांच्या सूचने वरून अहिल्यानगर जिल्हा उत्तर विभागाची कार्यकारणी पुनर्गठन बैठक श्रीरामपूर येथे लुंबिनी बुद्ध विहारात संपन्न झाली
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ.राजाराम बडगे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे राज्य सरचिटणीस अशोक केदारे नाशिक विभागाचे पालकमंत्री गौरव पवार आदींच्या उपस्थितीमध्ये सदरची निवड प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पडली यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले याप्रसंगी भिकाजी कांबळे यांनी संस्थेचे निकष व संस्थेची नियमावली उपस्थित असलेल्या सर्व श्रामणेर बौध्दाचार्यांना समजावून सांगितली त्यानंतर उपस्थित सर्व श्रामनेर बौध्दाचार्य यांचे संस्थेच्या नियमाप्रमाणे फार्म भरून निवड प्रक्रिया संस्थेचे निकष लावून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली
या निवड प्रक्रियेमध्ये कोपरगाव येथील बौध्दाचार्य व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोपरगाव शहराचे कार्याध्यक्ष पत्रकार बिपिन गायकवाड यांची जिल्हा संघटक पदी व कोपरगाव तालुका पालकमंत्री पदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीबद्दल कोपरगाव शहरासह जिल्ह्यामध्ये बौध्दाचार्य बिपिन गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच या २०२५-२०२८ च्या निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ दादर मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते बौध्दाचार्य बिपीन गायकवाड यांचा सत्कार करुन पुढील कार्याला आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या.