या जनता दरबारात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( Snehalata Kolhe ) यांच्या गटातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केला आहे.
तक्रारींचे निरसन होत नसल्याचा आरोप करत विवेक कोल्हे व ग्रामपंचायत सरपंच, नागरिकांनी तहसीलदारांच्या दालनात बैठक घेऊन रोष व्यक्त केला. भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, असे असताना जनता दरबारातून स्वतःची पाठ थोपटून घेत जनता समाधानी असल्याचे आभासी चित्र विद्यमान लोकप्रतिनिधी उभे करत आहेत, अशी टीका विवेक कोल्हे यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, जनता दरबारात भाजप व माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाच्या पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व सदस्यांना साधे निमंत्रण नाही. कुणाचा फोन आला तरच कामे होत आहेत. कुठेतरी पक्षपात होत आहे. प्रशासकीय यंत्रणा कुणाच्या दावणीला बांधली की काय, असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला.
प्रशासकीय यंत्रणेने कुणाचे नोकर न बनता जनतेचे सेवक बनावे व पक्षपातीपणा सोडावा. अन्यथा, नाइलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही विवेक कोल्हे यांनी प्रशासनास दिला. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी उत्तरे देत उपस्थितांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
विविध योजना, जातींचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात दलाल निर्माण झालेले आहेत. त्यांचे लागेबांधे वरपर्यंत असून, सर्वसामान्यांना याचा त्रास होत आहे. त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच, योजनेसंदर्भात नागरिकांना प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते.
हा प्रकार बंद व्हावा. स्वस्त धान्य दुकानदारांकडून पैसे घेतले जातात, हे योग्य नाही. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींच्या प्रस्तावांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, ग्रामपंचायतींकडून आलेल्या गायी-गोठ्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून, ते तातडीने मंजूर करावेत.
बालाजी उर्फ राजेंद्र चांगदेव वैराळ यांनी मांडल्या वेळापूर च्या अडचणी..
1. गावातील रस्त्यांची कामे
2. रमाई आवास योजना, शबारी आवास योजना बाबत
बघा व्हिडिओ -