सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या चांगल्या आवडलेल्या गोष्टींचा ट्रेंड होतंय.कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील पत्रकार तथा माजी सरपंच सचिन नामदेव कोळपे यांनी गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे साहेब स्म्रुती उद्यानाच्या स्वागत कमानी जवळील पिवळ्या गर्द व्रुक्षराजीचा फोटो मयुर सारडा यांच्या समवेत काढला आणि लग्नाचा सिझन आणि पिवळी उमलणारी फुले.....हळदीच्या रंगाने चैत्राची चाहुल घेवुन येणाऱ्या व नव्यानेच प्रवेशद्वाराचे रंगकाम झालेल्या कर्मवीर शंकरराव काळे स्म्रुती उद्यानाच्या सौंदर्यात या व्रुक्षमित्राने जणु भर घातली आहे...
फोटो-मयुर सारडा हा मथळा देवुन प्रसिद्ध केला त्यानंतर पत्रकार कोळपे यांना बंटी नवघरे यांनी निळ्याशार आकाशासह व डाॅ.दत्तात्रय कोळपे यांनी रात्रीच्या वेळी काढलेला फोटो पाठवला.
सोबतच कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण सर यांचा फोटो उमलुन येता फुलोरा.....काय करील उर्वशी मेनका....उनसावलीचा खेळ सगळा......
गोरक्षनाथ चव्हाण सरांच्या कॅमेर्याने टीपला हा आनंदसोहळा या मथळ्यासह व्हायरल झाला बस मग काय तर सध्या या फुलांचा परीसरात ट्रेड झालाय नव्याने रंगरंगोटी झालेल्या या कमानीच्या साक्षीने आपले एक छायाचित्र या फोटोसोबत घेण्याचा मोह बच्चे कंपनीला देखील आवरता आला नाही.