सुरेगाव-सांगवी, व मायगाव देवी-वेळापूर या पुलासाठी निधी मिळावा - ना. आशुतोष काळे यांची मागणी



एन. एच. 752 जी या राष्ट्रीय महामार्गाच्या कोपरगाव ते सावळीविहीर या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग नासिक यांचेकडून 178 कोटीच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे. 

त्यावेळी मतदार संघातील रस्ते विकासाबाबत झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान ना. आशुतोष काळे यांनी त्यांना निवेदन देवून गोदावरी नदीवर सुरेगाव-सांगवी, मायगाव देवी-वेळापूर पुलासाठी तसेच एस. के. एफ. च्या अंतर्गत येणार्‍या रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे.

गोदावरी नदीला पाणी असताना सुरेगाव-सांगवी, मायगाव देवी-वेळापूर या चारही गावांचे संपर्क पूर्णपणे तुटतात,
गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामस्थांची पुलाची मागणी आहे.
मायगाव देवी व सांगवी या दोन्ही गावांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोळपे वाडी येथील बँकांमध्ये यावे लागते तसेच परिसरातील सर्व रोजगार, दळणवळण याच मार्गाने होत असल्यामुळे नदीवर पुलाची मागणी होत आहे , हे लक्षात घेऊन ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मतदार संघातील रस्ते विकासाबाबत झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान ना. आशुतोष काळे यांनी त्यांना निवेदन देवून गोदावरी नदीवर सुरेगाव-सांगवी, मायगाव देवी-वेळापूर पुलासाठी तसेच एस. के. एफ. च्या अंतर्गत येणार्‍या रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे.

श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका

कोपरगाव सावळीविहीर रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून ना. नितीन गडकरी यांनी एन. एच. 752 जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर करून निधी देणार असल्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी 178 कोटी रुपये निधी दिला आहे.

त्याबाबत निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. कोपरगाव सावळीविहीर रस्त्यासाठी मिळालेला निधी ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांचे फलित आहे. मात्र ज्यांचा याच्याशी काडीचाही संबंध नाही ते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी विवेक कोल्हे यांचेवर केली आहे.
त्याबाबत मतदार संघातील नागरिकांना ना. आशुतोष काळे हे स्वत: माहिती देणार होते. मात्र त्यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते माहिती देवू शकले नाही. मात्र नेहमीच न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज असणार्‍या विरोधकांनी या संधीचा फायदा घेत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे.