काय घडले ? बघा व्हिडिओ -
Hope Hugh Edmeades is fine 😣😣
IPL Auctioneer collapses during LIVE auction.#IPLAuction2022 #IPLAuction #HughEdmeades #IPL pic.twitter.com/yWuZ2wZyS0— Christopher Philips (@noahsark30) February 12, 2022
आयपीएलच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होती. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाला खरेदी करण्यासाठी अनेक संघामध्ये चुरस सुरू होती. अशातच लिलाव घेणारे एडम्स अचानक स्टेजवरून खाली कोसळले. त्यांना नेमके काय झाले याबाबत अद्याप अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. ह्यूज एडमिडास सलग चौथ्यांदा आयपीएल लिलावाची सूत्रे संभाळत होते.
कोण आहे एडमिडास?
ब्रिटनचे रहिवासी असलेले एडमिडास हे 2018 पासून आयपीएलचा लिलाव घेत आहेत. याआधी पहिल्या मोसमापासून रिचर्ड मॅडली यांच्याकडे ही जबाबदारी होती. 36 वर्षांमध्ये एडमिडास यांनी जगभरात 2500 पेक्षा जास्त लिलाव घेतले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार एडमिडास यांची प्रकृती ठीक असून लंचनंतर लगेच लिलावाला सुरूवात होणार आहे.
कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये आणि लिलाव रक्कम
दिपक हुड्डा- (लखनऊ) ५.७५ कोटी
हर्षल पटेल- (आरसीबी)- ११ कोटी
जेसन होल्डर- (लखनऊ)- ८.७५ कोटी
नितीश राणा- (कोलकत्ता)- ८ कोटी
ड्वेन ब्रावो- (चेन्नई)- ४.४० कोटी
स्टीव स्मिथ- अनसोल्ड
सुरेश रैना- अनसोल्ड
देवदत्त पडिक्कल (राजस्थान)- ७.७५ कोटी
रॅबिन उथ्थपा- चेन्नई – २ कोटी
जेसन रॉय- (गुजरात) २ कोटी
शिमरन हेटमायर (राजस्थान)- ८.२५ कोटी
मनिष पांडे (लखनऊ)- ४.६ कोटी
डेव्हिड वार्नर (दिल्ली)- ६.२५ कोटी
क्विंटन डी कॉक (लखनऊ)- ६.७५ कोटी
फाफ ड्यू प्लेसीस (आरसीबी)- ७ कोटी
मोहम्मद शमी (गुजरात)- ६.२५ कोटी
श्रेयश अय्यर (कोलकत्ता)- १२ कोटी
ट्रेंट बोल्ट (राजस्थान)- ८ कोटी
कगिसो रबाडा (पंजाब)- ९.२५ कोटी
पॅट कमिन्स (कोलकत्ता)- ७.२५ कोटी
रविचंद्रन आश्विन (राजस्थान)- ५ कोटी
शिखर धवन (पंजाब किंग्स)- ८.२५ कोटी