दरम्यान गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडून शर्डी येथील मूळचे रहिवासी व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणारे हिंदी चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या दिल्ली येथील सुदर्शन कार्यालय व शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेल्या आरोपी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी सुरेश चव्हाणके यांच्या मुळगाव शिर्डी येथील घराची रेकी केली आहे.
या जिहादी आरोपींंकडे अवैध हत्यार, विस्फोटक पदार्थ, तसेच गोळाबारुद मिळून आले आहे. गुजरात एटीएसच्या दाव्यानुसार या आरोपींचे पाकिस्तान आतंकवादी संघटनेशी संबध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवीसह दोन असे आठ जणांना अटक करण्यात आली असून दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शिर्डीसारख्या अती संवेदनशील ठिकाणी आतंकवादी संघटनेचे लोक येऊन रेकी करून जातात याबाबत पोलीस यंत्रणेला काही कळत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी देखील साईसंस्थानला साईमंदीराबाबत धमकीचे मेल तसेच पत्र प्राप्त झाले होते.त्यामुळे त्यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र एटीएस ने संबंधित प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे. जगप्रसिद्ध साईमंदीराची सुरक्षेसाठी कंत्राटी पध्दतीने काम करणार्या कायम तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणारे हजारो सुरक्षा रक्षक संस्थान प्रशानाच्या ताफ्यात आहे.त्याचबरोबर क्युआरटी, बाँम्बशोधक पथक, अतिरिक्त पोलीस पथक असा मोठा सुरक्षेसाठी यंत्रणा उभी असून सतर्कता बाळगावी लागणार आहे.