खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राहुरीच्या एका आरोपीने चक्क कारागृहात ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचार्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला आहे.
संगमनेर येथील कारागृह विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. क्षमतेपेक्षा अधिक कैदी या कारागृहामध्ये अनेकदा असतात. कारागृहात कैद्यांना विविध सुविधा मिळत असल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या होत्या.
कारागृहात नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या कामगिरीबाबतही वेगवेगळ्या चर्चा होत असतात.