दोन महिन्यापूर्वी पठाण यांच्या चेहर्याचा वापर करत नेवासा शहरात टिंगल-टवाळी करत अश्लिल व आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करुन बदनामी केलेली होती. याबाबत पठाण यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, अशोक कुदळे, केवळ राजपूत, अंबादास गीते यांच्या विशेष पथकाने अहमदनगर सायबर सेलची मदत घेत गणेशपेठ पुणे येथून निखील रवीकिरण पोतदार याला ताब्यात घेत अटक केली.
आरोपीला नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पठाण यांची बदनामी करणार्या आरोपीच्या मुसक्या नेवासा पोलिसांनी आवळल्यामुळे व्हिडीओ प्रसारित करणार्यांचा खर्या सूत्रधार पोलिसांना मिळणार असल्याची आशा पल्लवित झाली आहे.
अश्लिल व्हिडीओ व फोटो प्रसारित करणार्यांवर सखोल तपास करुन कायदेशीर कारवाई करावी, यासाठी मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटले होते. त्यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी माझे अश्लिल व्हिडीओ फोटो प्रसारित करणार्यांचा तपास केला असून त्यांचे आभार मानतो.
- अल्ताफ पठाण