Talk On Mobile While Driving गाडी चालविताना मोबाईलवर बोलता येणार ! आता होणार नाही पोलिस कारवाई


 गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास कायद्याने मनाई आहे. तसं आढळून आल्यास वाहतूक पोलिसाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, आता पुढील काळात तुम्ही गाडी चालविताना बिनधास्त फोनवर बोलू शकाल. त्यासाठी तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की "गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता, परंतु फोन तुमच्या हातात नसावा. हेडफोन, ब्लूटूथवर तुम्ही फोनवर बोलू शकता. मोबाईल खिशात किंवा बाजूला ठेवलेला असावा. अशा पद्धतीने फोनवर बोलत असाल, तर तो गुन्हा ठरणार नाही.."
पोलिस कारवाई करणार नाहीत

गाडी चालविताना हेडफोनवर बोलत असल्यास वाहतूक पोलिस तुमच्यावर कारवाई करु शकत नाहीत. पोलिसांनी तशी कारवाई केल्यास तुम्ही त्याविरोधात कोर्टात जाऊ शकता. याबाबतची घोषणा लवकरच लोकसभेत करणार असल्याचे गडकरी म्हणाले.