Copper Wire Stolen सुरेगाव मध्ये गोदावरी नदी - मळई परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ! शेतकऱ्यांच्या मोटारी फोडून तांबे केले लंपास !

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीलगत सुरेगाव येथील मळई मध्ये   शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी काल रात्रीच्या वेळी चोरटे साधारण रात्रीच्या 10 ते 1 वेळे दरम्यान मोटारी फोडून त्यातील तांबे चोरून फरार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.



दिवसा लाईट असल्याने रात्री सहसा कोणीही मोटरिकडे जात नाही याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला आहे.हे मोटार चोरीचे सत्र पुन्हा चालू झाले आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोटारीकडे गस्त घालण्याची वेळ आली आहे.

जवळजवळ 5 मोटारी फोडल्या आहेत.ज्यांच्या मोटारी फोडल्या त्यांचे खूपच नुकसान झालेले आहे.त्यांनी नावे पुढीप्रमाणे 
सोपान एकनाथ वाबळे, अभिराज अजय वाबळे, सुनील  सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, राजेंद्र कदम, संदीप निकम इत्यादी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यां मध्ये भीती निर्माण झाली आहे.

याच्या आधी  फक्त 10 दिवसांपूर्वी च गोदावरी नदीलगत मंजूर कोपरगाव बंधारा शेजारील मायगाव देवी येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी चोरट्यांनी फोडून तांबे लंपास केले होते.