भरवस फाटा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे नात मयुरी हिचे नुकतेच लग्न होते.लग्न आटोपल्यावर चांगदेव भोसले हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी घरी गेले होते.सायंकाळी मनोज सोनवणे व चांगदेव भोसले हे पुन्हा लग्नस्थळी येत असतांना त्यांच्या (एम.एच.१५ बी.जे.१०१८) या क्रमांकाच्या हिरो आयस्मार्ट दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.या अपघातात भोसले यांच्या उजव्या हात पाय व डोक्याला जबर मार लागला होता.
त्यांना बेशुद्ध अवस्थेत लासलगाव येथील कृष्णाई हॉस्पिटल व नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी त्यांचे पुत्र विजय भोसले यांच्या तक्रारीवरून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.