त्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
फिर्यादी तरुणी हि कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड येथील रहिवासी आहे, ती मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालविते.
तिला बोलता येत नाही, ती मूकबधिर आहे.
आणि आरोपी हा याच गावातील व फिर्यादी महिलेच्या घरा जवळ राहणारा आहे.
सदर महिला हि दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शौचास गेली असता तिच्या पाळतीवर असलेला आरोपी हा तिच्या पाठोपाठ मोबाईल वर बोलण्याचे नाटक करत गेला व फिर्यादीजवळ जाऊन तिला धमकावुन मंदिराकडून ओढत काटवनात नदीजवळ नेऊन तिला धक्का बुक्की करून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे.
दि.२५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी व एक साक्षीदार मुलगी या दोघी सोबत शौचास जात असताना सकाळी ०९ च्या सुमारास आरोपी हा फिर्यादी माहिलेजवळ आपल्या दुचाकीवरून आला व तिचे जवळून दुचाकी घेतली व फिर्यादिसह साक्षिदार मुलींबरोबरही बोलून निघून गेला होता.त्या नंतर फिर्यादीचे रात्री घरात भांडण झाले.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी कोपरगाव लायन्स क्लब मुकबधिर विद्यालय येथील शिक्षिक, शिक्षिका, मुलीची आई,महिला अंमलदार यांचे समक्ष जबाब दिल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक जाधव, स.पो.नि.आव्हाड यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं.६३/२०२२ भा.द.वि.कलम ३७६,३२३,५०६ प्रमाणे आरोपी विरूद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.
ग्रामीण भागात मूक बधिर महिलेवर बलात्काराची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.