ARRANGE MARRIAGE ISSUE लग्नाला नकार देणार्‍या मुलीच्या बापावर मुलाने केला कोयत्याने हल्ला



 युवकाबरोबर मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिला होता. याचा राग मनात धरून त्या युवकाने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने खूनी हल्ला केला.


आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) असे हल्ला करणार्‍या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकाश गायकवाड विरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादीने त्यांच्या मुलीचे लग्न आकाश गायकवाड याच्यासोबत लावून देण्यास नकार दिला होता. याचा राग आल्याने आकाश गुरूवारी दुपारी फिर्यादीच्या घरी गेला होता.


शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केला. त्यानंतरचा दुसरा वार फिर्यादीने चुकवण्याचा प्रयत्न केला असता आकाशने पुन्हा त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर कोयत्याने वार केला.



सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर या प्रकरणाचा तपास करत आहेत