RIGOROUS IMPRISONMENT राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा !

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबत निवडणूक आयाेगाला माहिती दिली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.

याबाबत भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार, लोकप्रतिनिधी कायद्यान्वये बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

नेमकं प्रकरण काय..?

2011 मध्ये ‘म्हाडा’च्या यंत्रणेकडून बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा फ्लॅट विकत घेतला होता. नंतर 19 एप्रिल 2011 रोजी त्यांनी या फ्लॅटचा ताबा घेतला. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, त्यांनी मुंबईतील या प्लॅटबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याची तक्रार अमरावतीतील अचलपूरचे भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली होती. बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

D NEWS UPDATES ON WHATSAPP
CLICK HERE TO JOIN



दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप बच्चू कडू यांनी फेटाळून लावले होते. ‘राजयोग सोसायटी’ने सर्व आमदारांना घरे उपलब्ध करुन दिली होती. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपयांचे कर्जसुद्धा उपलब्ध करुन दिले होते, पण कर्जाची परतफेड करता न आल्याने विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांआधीच तो प्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी 2017 मध्ये केला होता..

चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात गेल्या 5 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. कोर्टाने बच्चू कडू यांचा दावा फेटाळून लावताना, त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच 25 हजार रुपयांचा दंड केला