Kopargaon Road Construction कोपरगाव तालुक्यातील 703 लाखाचा 'हा' रस्ता एकाच वर्षात फुटला

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून जेऊर पाटोदा - धारणगाव रस्ता शासनाने 703 लाख रुपये खर्चून वर्षभरापुर्वी हा रस्ता तयार केला होता,  मात्र वर्ष होत नाही तोच रस्त्यावर खड्डे पडले असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.


2020 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर,धारणगाव,सोनारी, रवंदे या प्रा.जी.मा 8 वरच्या 10 किलोमीटर च्या रस्त्याला सातशे तिन लक्ष रुपये  खर्च करण्यात आले होते .
एकाच वर्षात धारणगाव पुलाच्या नळ्या वरील स्लॅब फुटून रस्ता खचून गेला आहे. 

राज्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास मुख्यमंत्री ग्रामसडक  योजने अंतर्गत केला जातो. 

या योजनेतील कामावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहमदनगर यांचे नियंत्रण असतांना एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो. हा चर्चेचा विषय ठरत आहे.

 सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती चा कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवन्याची मागणी ग्रामस्थांनी केली  आहे.