वीरभद्र महाराजांची यात्रा गावोगाव भरते व तेथे भक्तगण त्यांची विधिवत पूजा करून स्तवन करतात.या शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वेळापूर येथे वैराळ कुटुंबाच्या क्षेत्रातील जागृत देवस्थान म्हणून श्री वीरभद्र देवस्थान प्रसिद्ध आहे.
आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी वैराळ कुटुंबाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बिरोबा महाराजांची यात्रा साजरी केली.
गावातील सर्व ग्रामस्थानी सहभाग घेऊन बिरोबा महाराजांचे दर्शन घेतले.
कोण आहे वीरभद्र ?
दक्ष प्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञ समारंभात गेली.
तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.
त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.
शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.
वीरभद्र महाराजांची यात्रा गावोगाव भरते व तेथे भक्तगण त्यांची विधिवत पूजा करून स्तवन करतात.या शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वेळापूर येथे वैराळ कुटुंबाच्या क्षेत्रातील जागृत देवस्थान म्हणून श्री वीरभद्र देवस्थान प्रसिद्ध आहे.
सकाळी 9 वाजता गावातून बिरोबा महाराजांची काठी मिरवणूक निघाली गावातून 12 वाजता मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचली.
12 वाजता पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.