Teacher Training निवड श्रेणीसाठी नोंदणी झालेल्या शिक्षकांचे होणार प्रशिक्षण

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणी झालेल्या सर्व पात्र शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. याबाबतची मागणी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक यांच्याकडे करण्यात आली होती. 
शिक्षण संचालक यांनी प्रशिक्षण परिषदावरील कार्यवाही पूर्ण झाली असून, लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक होणार आहे. यानंतर लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार असल्याचे आश्वासन  दिले.
सर्व पात्र प्रशिक्षणार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संघटनेच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत. राज्यातील हजारो शिक्षकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्यानंतर भरलेल्या अर्जामधील तांत्रिक बाबींची पुर्तता देखील केलेली आहे. मात्र, आतापर्यंत प्रशिक्षणासंदर्भात कोणतीच कार्यवाही झालेली नव्हती.