PM KISAN SANMAN NIDHI YOJNA ‘अशा’ शेतकऱ्यांवर दाखल होणार फसवणूकीचा गुन्हा, जेलची हवा खावी लागेल..!


2000 रूपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रत्येकी याप्रमाणे तीन हप्त्यात दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा लाभ अनेक शेतकरी अपात्र असून देखील लाभ घेत असल्याचे समोर आले आहे... त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अनेक शेतकरी आहेत, जे PM KISAN योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत. मात्र, तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांना 2000 रुपये प्राप्त होत आहेत. मात्र, अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश आता सरकारने दिले आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार आता पूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेश प्रत्येक तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. नियम काय..? Eligibility for PM KISAN YOJNA घरातील एकच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य PM KISAN योजनेचा लाभ घेत असतील, तर तुम्हाला हप्त्याचे 2000 रुपये परत करावे लागतील. तसेच आत्तापर्यंत जितके हप्ते आले ती पूर्ण रक्कम परत करावी लागणार आहे. उदाहणादाखल, एका कुटुंबातील एकाच जमिनीवर आई, वडील, पत्नी आणि मुलाला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असल्यास त्यांना सरकारला मिळालेले सर्व पैसे परत करावे लागणार आहेत. लक्षात घ्या PM KISAN योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो. एकाच जमिनीवर एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रसंगी अशा प्रकरणात जेलची हवा देखील खावी लागणार आहे. सरकारने या योजनेच्या काही महत्त्वाचे नियमांत बदल केले आहेत. आता ज्यांच्या नावावर शेती असेल, त्यांनाच PM KISAN सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणाला लाभ मिळणार नाही..? Ineligible For PM KISAN – शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने इन्कम टॅक्स भरला असेल, तर त्याला योजनेचा लाभ मिळत नाही. – शेतीयोग्य जमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे. – एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल, तर त्यालाही पीएम किसानचा लाभ मिळणार नाही. – रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांना देखील या योजनेबाहेर ठेवण्यात आले आहे. – एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल, तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला आणखी माहिती PM Kisan Portal येथे मिळेल.