या सर्व प्रकारामुळे संपुर्ण मंडलिक वस्ती परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
याच परिसरतील जगन्नाथ जाधव यांची शेळी 3-4 महिन्यापूर्वी रात्री 2 वाजता बिबट्याने उचलून नेली होती, सदर प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला होता,
सदर परिसरातील नागरिक तेव्हापासून भयभित झाले होते,
त्यांनतर पिंजरा देखील लावला होता परंतु त्यात देखील बिबट्या सापडला नाही.
आता गेल्या महिन्या पासून 3-4 दिवसांच्या अंतराने बिबट्याचे दर्शन संध्याकाळी 6 नंतर होत आहे.
संध्या शेतातील कामे सुरू आहेत, रात्री अपरात्री पाणी भरावे लागते.
तसेच कांदा लागवड झालेली आहे, रात्रीची लाईट असल्यामुळे पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे भाग पडत आहे,गव्हाला देखील पाणी उभे राहुनच भरावे लागते पण आता बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे .
गेल्या ४/५ महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे.
या परीसरातील बिबट्याच्या पायाचे ठसे येथील शेतकऱ्यांनी बघितले आहेत परीसरातील वेळापूर चे ग्रामस्थ मंडलिक, मोकळ, गोरे या शेतकऱ्यांनी सदर प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या परीसरातील ग्रामस्थांची आहे
बिबट्या,बिबळ्या किव्हा वाघरू हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे,परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात.खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे.भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.
या परीसरातील बिबट्याच्या पायाचे ठसे येथील शेतकऱ्यांनी बघितले आहेत परीसरातील वेळापूर चे ग्रामस्थ मंडलिक, मोकळ, गोरे या शेतकऱ्यांनी सदर प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या परीसरातील ग्रामस्थांची आहे