ब्राम्हणगावात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार

ब्राम्हणगावात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षकांचा व विद्यार्थांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शालेय शिक्षण घेत असताना जीवनात उंच भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व निश्चयी बनण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांनी केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे तज्ञ संचालक श्रावण आसने, युवा उद्योजक राहुल सोनवणे ,तुकाराम आसने,विठ्ठल सोनवणे, संजय साबळे, शिवनाथ आहेर ,आण्णा जगधने ,विनोदकुमार सोनवणे,मुख्याध्यापक श्री झाल्टे सर सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री भिकराज तांबे मामा यांनी सर्व शिक्षकांचा शाल देऊन सत्कार केला कु अनुष्का तांबे हिचा वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड झाल्याबद्दल व श्रेया किशोर आष्टेकर ,स्नेहल किशोर तनपुरे यांचा सर्व मान्यवर यांचेकडून सत्कार करण्यात आला.