कोपरगाव प्रकल्पातील 3 सेविकांना कुशल अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र देऊन सन्मानित…..

कोपरगाव प्रकल्पातील 3 सेविकांना कुशल अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र देऊन सन्मानित…..

कोपरगाव प्रतिनिधी -: आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस २९/६/२४ ECCE day पासून सुरू असलेल्या बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या दैनंदिन कृती अंगणवाडीत पूर्ण करून त्याच्या परिपूर्ण नोंदी निश्चित करून दिलेल्या ग्रुप वर घेणे तसेच अंगणवाडीत विविध कार्यक्रम करून बालशिक्षण दिवस काय हे कार्यक्रमाद्वारे साजरे करणे,पालकांपर्यंत त्याची माहिती प्रसारित करून मुलांना अंगणवाडी मध्ये येण्यास प्रवृत्त करणे मुलांचे विविध खेळ कृती ॲक्टिव करून मुलांचे मनोरंजन करणे.माता पालक प्रबोधनपूर्ण कार्यक्रम सादरीकरण असे उल्लेखनीय काम केल्याबद्दल कोपरगाव प्रकल्पातील बीट येसगाव मधील 3 सेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

ब्राम्हणगावातील धात्रकवस्ती येथील अंगणवाडी सेविका लता अनिल शिंगाडे यांना कुशल अंगणवाडी सेविका म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले…त्या सोबत गावठाण अंगणवाडी सेविका जोशी मॅडम तसेच धारणगाव येथील सेविका वनिता चौधरी यांना देखील प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे माजी .बालविकास प्रकल्प अधिकारी मा.वाघिरे साहेब तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय रुपाली धुमाळ मॅडम,पर्यवेक्षिका देवगुणे मॅडम सर्व प्रकल्प वृंद यांचे सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले