Maratha Reservations मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण ! संभाजीराजे छत्रपतींची घोषणा !


मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजे यांनी मुंबईत केली आहे.
5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाल्या नंतर मागील वर्षापसून अनेकवेळा आंदोलनं केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, आक्रमक आंदोलन केली. मात्र, आता उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही.
ज्यावेळी आरक्षण रद्द झालं त्यावेळी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपलं आरक्षण रद्द कसं झालं यासंदर्भात राजकीय नेत्यांसमोर भूमिका माडंली.
समन्वयक यांनी मला सांगितल टोकाची भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. परंतु सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही.
त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.