श्रीगोंदा शहरातील राहुल सुरेश आळेकर (वय २२), काष्टी येथिल केशव सायकर (वय २२), श्रीगोंदा शहरातीलच आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८) अशी या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
अपघात घडल्यानंतर जवळच्या हॉटेल अनन्याचे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढत उपचारासाठी नेण्यासाठी १०८ डायल करून अंबुलांस बोलावली होती. परंतु यातील केशव व आकाश या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. राहुलला उपचारासाठी श्रीगोंदा शहरात आणले परंतु तिथपर्यंत त्याची प्राणज्योत सुद्धा मालवली होती.
आणखी माहितीनुसार राहुल आणि आकाश हे केशव याला काष्टी येथे घरी सोडवण्यासाठी त्यांच्या मित्राची स्विफ्ट कार घेऊन निघाले होते. त्यावेळी रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे बोललं जातं आहे , या अपघातामुळे श्रीगोंदयासह संपुर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.