पूर्ण घटनाक्रम असा -
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्केटिंगचे काम करणारे अनिकेत मच्छिंद्र कडलग (वय 29, रा. जवळेकडलग ता. संगमनेर) हे ओमिनी व्हॅनमधून (क्रमांक एमएच 12 केजे 7975) प्रवास करीत होते. ते शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कोंची घाटात आले असता दरम्यान ओमिनी गाडीच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी ओमीनी गाडीच्या काचेवर दोन अंडे फेकले. त्यामुळे अनिकेत कडलग यांनी ओमनी गाडी थांबविली. त्यानंतर तत्काळ तिघा चोरट्यांपैकी दोघांनी दुचाकीवरून खाली उतरून एका चोरट्याने अनिकेत कडलग यांच्या डोक्यात टनक वस्तू मारली व चाकूने हातावर वार केला.
अनिकेत कडलग यांना मारहाण (Beating) करीत ओमीनी (Omni Van) गाडीच्या सीटवर ठेवलेली 60 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी बळजबरीने काढून घेत पसार झाले. त्यानंतर अनिकेत मच्छिंद्र कडलग यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाणे (Sangamner Police Station) गाठले फिर्याद दिली. या रस्तालुट (Road Robbed) प्रकरणी तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खंडीझोड (Sub Inspector Police Vijay Khandizod) अधिक तपास करीत आहेत.