याबाबत पोलीस ठाण्याकडून (Police Station) समजलेली माहिती अशी की, जयेश रामलाल कर्डिले (वय 22) धंदा- ट्रान्सपोर्ट रा. सांगवी म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा यांनी 16 डिसेंबर 20 रोजी विमा सेवा केंद्र वडाळा बहिरोबा ता नेवासा येथे ट्रक (एमएच 20 एटी 9550) या वाहनाची एक वर्षाकरिता इन्शुरन्स पॉलिसी (insurance Policy) काढली. या पॉलिसीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून 54 हजार 723 रुपये भरून घेतले.
जयेश कर्डिले यांनी कागदपत्रांची शहानिशा करण्याकरता विचारले असता रणजीत कुर्हे याने शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी रणजीत मच्छिंद्र कुर्हे रा. खरवंडी ता. नेवासा याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 20/2022 भारतीय दंड विधान कलम 420, 465, 468, 471, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर माळवे पुढील तपास करत आहेत