नेवाशातील अश्लिल व्हिडीओ प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड


नेवासा शहरातील (Newasa City) सामाजिक कार्यकर्त्याच्या चेहर्‍याचा वापर करत अश्लिल आक्षेपार्ह व्हिडीओ (Pornographic Offensive Video) सोशल मीडियातून प्रसारित (Broadcast through Social Media) करुन बदनामी केल्याप्रकरणी पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी (Newasa Police) सायबर क्राईमच्या (Cyber ​​Crime) मदतीने एक आरोपी गजाआड केल्यानंतर आणखी पुणे (Pune) येथून आणखी दुसरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला काल सोमवारी न्यालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Cell) मिळाली आहे
सोशल मिडीयातून शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांच्या बदनामी नाट्यात आणखी चार आरोपी फरार असल्याचे दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यामुळे तपासात उघड झालेले आहे. पोलीस आणखी चौघा आरोपींचा शोध घेत आहेत. नेवासा पोलीस आणि सायबर क्राईमकडून बदनामी करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या कामगिरीचे जनतेतून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, पठाण यांच्या चेहर्‍याचा वापर करत अश्लिल व आक्षेपार्ह व्हिडीओ पठाण यांच्या चेहर्‍याला जोडत सोशल मीडियातून पठाण यांची बदनामी करण्यासाठी बनविलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झालेला होता या प्रकरणी पठाण यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दाखल केलेली होती.
पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी तपासाची चक्रे फिरवून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पोलीस फौजफाटा तपास कामी रवाना करुन सायबर सेलच्या मदतीने पुणे येथून निखिल रविकिरण पोतदार यास अटक (Arrested) केली असता या प्रकरणी पुन्हा आणखी दुसरा आरोपी पप्पू उर्फ तौसिफ गुलाम दस्तगीर (वय 34) रा.रविवार पेठ पुणे याला अटक केली.
आरोपीला नेवासा न्यायालयासमोर (Newasa Court) हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Cell) मिळाली. दोन आरोपी गजाआड झाल्यामुळे या गुन्ह्याच्या मुळापर्यंत नेवासा पोलीस (Newasa Police) पोहचले आहेत.

आणखी चार आरोपी कटात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणी गुन्ह्यात फरार असलेले आरोपी फुरकान अन्सारी (रा. बुधवार पेठ पुणे), बिलाल डमरा (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही), सिब्बा (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही), असिफ पठाण (नेवासा) असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.