छतावर झोपलेल्या पती पत्नीचा खून - कोपरगाव तालुक्यात खळबळ !

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव गावातील वस्तीवर 

 रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय-६५) 

व 

पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय-६०) 

हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना 


त्यांचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 




त्यांना दोन मुले आहेत आणि ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करतात.
 

दोन दिवसापासून आपले आई वडील फोन उचलत नाहीत, यामुळे शंका आल्याने 


आल्याने त्यांनी चौकशी करण्यास चुलत भावाला पाठवले असता हि घटना उघड झाली.


आपेगाव या ठिकाणी शेतातील वस्तीवर दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी हे राधाबाई भुजाडे 
 हे दाम्पत्य राहत होते. 


त्यांना दोन मुले आहेत आणि ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करतात.


ते आई आणि वडिलांना दि.३० मे पासून फोन करत होते.


मात्र फोन उचला जात नव्हता. 

त्यामुळे शेतात काही काम चालू असेल असे त्यांना प्रथम वाटले.


मात्र दोन दिवस उलटूनही आणि परतीचा फोन न आल्याने 

त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करून आईवडिलांची स्थिती बघण्यासाठी घरी पाठवले

ते घरी गेले असता तेथे त्यांच्या घरास कुलुप होते.


म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही आवाज आला नाही. 


 म्हणून त्यांनी घराच्या शेजारील विद्युत खांबावर जाऊन पाहिले

त्यावेळी त्यांना दोघे नवरा बायको मृतावस्थेत दिसून आल्याने धक्काच बसला. 

तात्काळ त्यांनी घटनेची माहिती पोलिसाना दिली.

पोलिसानी दोन्ही शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. 



आणि तपासाची चक्रे फिरवली आहेत. 



त्यांचा कुणाशी वाद झाले होते का अशी प्राथमिक चौकशी पोलिसानी केलेली आहे.