मायगाव देवी मध्ये गोदावरी नदी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ! मोटारी फोडून तांबे केले लंपास !

   कोपरगांव तालुक्यातील गोदावरी नदीलगत मंजूर कोपरगाव बंधारा शेजारील मायगाव देवी येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी काल रात्रीच्या वेळी चोरटे साधारण रात्रीच्या 10 ते 1 वेळे दरम्यान मोटारी फोडून त्यातील तांबे चोरून फरार झाले आहे.
दिवसा लाईट असल्याने रात्री सहसा कोणीही मोटरिकडे जात नाही याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला आहे.हे मोटार चोरीचे सत्र पुन्हा चालू झाले आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोटारीकडे गस्त घालण्याची वेळ आली आहे.
जवळजवळ 10 मोटारी फोडल्या आहेत.ज्यांच्या मोटारी फोडल्या त्यांचे खूपच नुकसान झालेले आहे.त्यांनी नावे पुढीप्रमाणे शिवाजी नाजगड,गोरख नाजगड, उत्तम येवले,साईनाथ कोटमे,बाळासाहेब गडाख,भारत गडाख इत्यादी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना 
भीती निर्माण झालेली आहे.