Soyabean Rates सोयाबीन चे भाव पुन्हा उच्चांकावर ! बळीराजा आनंदी !

सोयाबीनचे भाव वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. कारण, तब्बल तीन महिन्याच्या नंतर आज ७ हजार रुपयांचे वर सोयाबिनला भाव मिळतो आहे. 

राज्यात आज सोयाबीन बाजार समितीमध्ये ७३०० रूपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित झाल्याचे बघायला मिळाले.
सोयाबीनचे भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपली गरज थोडक्यात पैशांमध्ये भागवून सोयाबीन विक्रीसाठी ठेवले होते. अशा शेतकऱ्यांना या सोयाबीन भाव वाढीचा फायदा होणार आहे. 

मागील महिन्यापासून दर मिळत नसल्याने बाजार समित्यांमधील आवक सुद्धा कमी झाल्याचे दिसून आले. दर कधीपर्यंत असेच राहतील याबाबत मात्र निश्चित सांगता येणार नाही. 



रशिया आणि युक्रेन युद्धामुळे दर वाढले का? इंडोनेशिया आणि मलेशिया भारताला आरबीजी पामोलिन आणि कच्चा पामतेलाचा पुरवठा करणारे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल मुख्यत: अर्जेटीना आणि ब्राझीलहून आयत केले जातात. 

त्याचप्रमाणे कच्चे सूर्यफूल तेल यूक्रेन, रशिया आणि अर्जेटीना येथून आयात केले जाते. मात्र, सद्या रशिया आणि युक्रेनचा वाद पेटल्यामुळे या युद्धाचा परिणाम भारतातील सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

कच्च्या खाद्य तेलाच्या सोबतच इतरही जीवनावश्यक खाद्यवस्तू महाग होतील असे बोलले जात आहे. जीवनावश्यक पदार्थांच्या किंमतीत वाढ होऊन भारतीय लोकांवर याचा परिणाम जाणवू लागेल. रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. या तणावाचा परिणाम अनेक आर्थिक गोष्टींवर सुद्धा होण्याचा अंदाज लावण्यात येत आहे.