Nashik Google Dog Finds Kidnapped Girl : नाशिक पोलीसांच्या डॉबरमन ने शोधली अपहृत अकरा वर्षांची अपहृत मुलगी

भीमनगर, जेलरोड Nashik येथील रहिवाशी रात्री ८ वाजे नंतर जेवण झाल्यानंतर ११ वर्षांच्या मुलीला घेऊन आपल्या पाळीव श्वानास फिरवत होते. 
फिरून झाल्यानंतर घर जवळ आल्याने त्यांची मुलगी ‘घरी जाते’ असे सांगून तेथून गेली. काही वेळाने तिचे वडील घरी आले. मुलीचे बूट त्यांना दिसले नाही म्हणून त्यांनी पत्नीकडे विचारणा केली, परंतु ती घरी आलीच नाही असे त्यांना समजले.

मुलगी घरी न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला , उपनगर पोलिसांना ही बाब कळविल्याने निरीक्षक पंकज भालेराव (Inspector Pankaj Bhalerao) यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व मुलीची शोध मोहीम सुरू केली.  रात्री १२.३० वाजता श्वान पथकाला पाचारण केले गेले. पथकातील गुगल नावाच्या श्वानाने मुलीचे बूट, कपडे हुंगले.
 त्याने घरापासून प्राइड लीली सोसायटी (Pride Lily Society), सेंट्रल जेल (Central Jail) समोरील रस्ता असे दोन रस्ते दाखवले. नंतर गुगलने आंबेडकरनगर परिसरातील सम्राट गार्डन (Samrat Garden, Ambedkar Nagar) येथे तिला शोधून काढले. पथकाने मुलीला ताब्यात घेतले आणि सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
 निरीक्षक पंकज भालेराव, यांच्यासह श्वान पथकाचे गणेश खोंडे, अरुण चव्हाण, सुधीर देसाई, भास्कर गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हरवलेली मुलगी शोधण्याची पहिलीच कामिगरी (The first achievement of finding a missing girl)
पोलिस दलात श्वान पथकाकडून खून (Murder), दरोडा (Robbery)  उकल केली जाते. मिसिंग केसमध्ये श्वान पथकाला प्रथमच पाचारण करण्यात आले होते. पहिलीच कामगिरी डॉबरमन जातीच्या गुगल श्वानाने यशस्वी करून पोलिस दलाची आणि श्वान पथकाची शान वाढवली आहे.
नाशिक पथकात चार श्वान कार्यरत आहेत. (Four dogs working in the Nashik squad) First Achievement
श्वान पथकात गुगल (Google), मॅक्स (Max), निता (Neeta), सिंबा (Simba) हे श्वान कार्यरत आहेत.  त्यांना असे गुन्हे शोधण्यासाठी ९ महिने प्रशिक्षण देखील दिले जाते.