Godavari Canal 'ही' आहे गोदावरी कॅनॉल च्या उन्हाळी आवर्तन पाणी अर्ज भरण्याची शेवटची मुदत

गोदावरी कालव्याच्या उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने सात क्रमांकाच्या पाणी मागणी अर्ज करण्याच्या सूचना जाहीर प्रकटनाद्वारे लाभधारक शेतकर्‍यांना व पाणी वापर संस्थांना करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी मागणीचे अर्ज 10 मार्च 2022 पर्यंत संबंधीत शाखा कार्यालयात दाखल करता येणार आहेत. Godavari Kalva 
उन्हाळ हंगाम 2021-2022 मध्ये उपलब्ध होणारे पाणी विचारात घेवून ठराविक क्षेत्राला पाणी मागणी अर्ज संरक्षित सिंचनाकरिता विहीरीच्या पाण्याची जोड असणार्‍या सर्व प्रकारच्या बारमाही पिकांसाठी पाणी देण्याचे जलसंपदाचे धोरण असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुभाष के. मिसाळ यांनी दिली. उन्हाळी आवर्तनाचा फायदा घेण्यासाठी आपआपले पाणी मागणी अर्ज नजिकच्या सिंचन शाखा कार्यालयात 10 मार्च पर्यंत सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जलसंपदाने केले आहे. 
यामध्ये ऊस, फळबागा तसेच अन्य बारमाहि पिकांचा समावेश आहे. शासन धोरणानुसार धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळा हंगामा अखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात औद्योगिक कारखाने व शेतीच्या पिकासाठीपाणी पुरवठा करावयाचा असल्याने शेतीसाठी उपलब्ध होणारे पाण्यात पाणी पुरवठा करतांना आवर्तन कालावधी कमी अधिक अंतर करुन ते पुरवावे लागते.
सध्या रब्बीचे दुसरे आवर्तन सुरु आहे. उजवा कालवा सुरु आहे. डावा कालवा फुटल्याने त्याची दुरुस्ती सुरु आहे.