संपत डिंबर यांनी दिलेल्या इशार्यानंतरही मागणी (Demand) मान्य न झाल्यामुळे त्यांनी पाण्याच्या टाकीवर (Water Tank) चढून आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला आहे.एक तासच्या नाट्यानंतर यावेळी पो. उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे (Sub-Inspector Rohidas Thombre) व गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी त्यांना आश्वासीत केल्यानंतर डिंबर यांनी खाली उतरत आत्मदहन (Self-immolation) करण्याचा निर्णय मागे घेतला.
संपत डिंबर यांनी पंचायत समितीच्या अधिकार्यांना दिलेल्या अर्जात म्हंटले आहे, सन 2021 ते 2022 ची पंतप्रधान अवास योजने (Prime Minister Housing Scheme) मार्फत घरकुल योजना मंजुर झालेली आहे. त्यामध्ये ड यादी प्रसिध्द करण्यात आली असून सदरच्या यादीमध्ये गावातील 132 लोकांना घरकुल मंजुर झालेले आहे.
परंतु सदरची यादी ही प्रत्यक्ष सर्व्हे न करता जाहीर केलेली असून गावातील 128 लोकांची सदर यादीस हरकत आहे. सदर यादी ही निपक्षपणे व कोणत्याही आर्थिक परिस्थीतीची शहानिशा केलेली नसताना मंजुर करण्यात आलेली आहे. सदरची यादी आहे तशी राहील्यास आर्थिक परिस्थीती बिकट असलेल्या लोकांना वंचित ठेवण्यात येणार व मोठा अन्याय होणार आहे.
सर्व गोष्टीचा विचार करून टाकळी येथील घरकुल यादीचा व अपात्र लाभाथ्याचे नावे फेर सर्वे करून व प्रत्यक्ष शहानिशा करून फेर सर्व्हे दि. 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्यात येवुन सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत टाकळी येथे ग्रामसभा घेवुन यादी वाचन करण्यात यावी. तसे न झाल्यास मी त्याच दिवशी ग्रामपंचायत हददीत आत्मदहन करणार आहे.
सदर अर्जाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे संपत डिंबर यांनी मंगळवारी पाण्याच्या टाकीवर बसून दुपारी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपस्थित अधिकार्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना आश्वासीत केल्यानंतर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याप्रसंगी संपत डिंबर व त्यांचे कुटुंबीय, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पो.उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी, विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमळ, उप अभियंता पवार, शाखा अभियंता लाटे, ग्राम विकास अधिकारी पाटील, पोलीस पाटील राजेंद्र देवकर, सरपंच संदीप देवकर व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.