Shocking News From Nagar - बाथरूम मध्ये अंघोळ करत असलेल्या मुलीची मोबाईल मध्ये व्हिडिओ काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

नगर शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

बाथरूममध्ये अंंघोळ करत असलेल्या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करणार्‍या एका तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्वरगल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून मुलीने फिर्याद दाखल केली आहे.


सुमारे 1 महिन्यापूर्वी मी घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत असताना खिडकीतून कशाचा तरी आवाज आल्याने मी खिडकीकडे पाहिले तेव्हा अजरूद्दीन बेग हा खिडकीमध्ये त्याचा मोबाईल ठेवून मी अंघोळ करत असल्याचे चित्रिकरण करत होता. 

त्याचा हा प्रकार पाहून मी त्याला ओरडले असता तो त्याचा मोबाईल फोन घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 


झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला असता वडिलांनी मला व माझ्या आईला शांत राहण्यास सांगितले. यानंतर आई-वडिलांमध्ये वाद झाला. आम्ही मामाकडे राहण्यासाठी गेलो. 
वडिलांच्या भितीपोटी फिर्याद देण्यासाठी आले नसल्याचेही पीडित अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. 

एक महिन्यानंतर पीडिताने सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 


आरोपी अजरूद्दीन बेगविरोधात आता गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.