Shirdi Airport Air India 18 फेब्रुवारीपासून पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा सुरू होणार

कोपरगाव तालुक्यातील (Kakdi, Kopargaon) काकडी (Kakdi) येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन (Shirdi Airport) पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा (Pune-Shirdi-Nagpur Airlines) 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. 

तशी तयारी विमानतळ विकास प्राधिकरणाने (Airport Development Authority) केली आहे. एअर इंडिया ही विमानसेवा (Air India is the Airline) सुरु करणार आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव (Shirdi Airport
 Director Sushilkumar Srivastava) यांनी दिली .
नागपूर व पुणे विमानसेवा (Nagpur and Pune Airlines) सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे (Corona) मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत होत आहे. 

सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. बंगलुरूसाठी (Bangalore) दोन, दिल्ली एक, हैदराबाद (Hyderabad) एक, चेन्नई (Chennai) एक अशा पाच विमानफेर्‍या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा (Pune-Shirdi-Nagpur Airlines) सुरु होणार आहे. पुणे (Pune) येथून येणारे विमान शिर्डी (Shirdi) येथे येईल व तेच विमान नागपूरला (Nagpur) जाणार आहे.

त्याच दिवशी हे विमान नागपूरवरुन शिर्डीला येईल व तेथून पुढे पुणे येथे जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा विमान कंपनीची तयारी आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात, यावरच ही सेवा यामार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. विमानतळावरून करोनाआधी 25 हून अधिक विमानफेर्‍या होत्या. त्या पूर्ववत होण्याची सर्वांना अपेक्षा आहे.


या विमानतळाच्या भरवशावर काकडीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी कर्ज घेऊन प्रवासी वाहतुकीसाठी वाहने खरेदी केली आहेत,  मात्र गेल्या दोन अडीच वर्षांपासून उड्डाणे कमी असल्याने प्रवाशीसंख्या कमी झाली आणि त्यांचा रोजगार बुडाला आहे त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.